ज्ञानमंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांकडून भारतीय शीतपेयांबाबत जागृती

ज्ञानमंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांकडून भारतीय शीतपेयांबाबत जागृती

घाटकोपर, ता. १८ (बातमीदार) : सध्या शहरातील वातावरणात अनेक बदल घडत आहेत. आता उन्हाळ्याची तीव्र झळ बसत असल्याने अनेक जण तहान भागवण्यासाठी विविध कोल्ड्रिंक्सचा वापर करतात; मात्र त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन घाटकोपर पूर्वेतील ज्ञानमंदिर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी भारतीय शीतपेयांचे सादरीकरण केले. उन्हाळा सुरू असला, तरी गेले काही दिवस अवकाळी पावसाची सर, ढगाळ वातावरण याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम जाणवत आहेत. दरम्यान शहरातील विविध विकासकामे जलदगतीने होत असल्याने धूलिकरणाचादेखील श्वसन क्रियेवर कमालीचा परिणाम जाणवत आहे. ज्ञानमंदिर शाळेचे अनिल झोरे यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता तिसरी, चौथी आणि पाचवीतील विद्यार्थ्यांनी उन्हाळ्यात नागरिकांनी भारतीय शीतपेय घ्यावीत, यासाठी ताक, लिंबू सरबत आणि कोकम सरबत बनवून शिक्षक, पालकांना ते सादर केले. ‘सुरू झाला उन्हाळा घेऊ ताक, लिंबू सरबत आणि कोकमचा पेला’ या संकल्पनेतून त्यांनी हे भारतीय शीतपेयांचे प्रदर्शन मांडले होते. या वेळी भारतीय शीतपेयांचे आरोग्याला होणारे फायदे याची माहिती नागरिकांना दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com