सेंट जोसेफ महाविद्यालयात रंगला उर्मी महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेंट जोसेफ महाविद्यालयात रंगला उर्मी महोत्सव
सेंट जोसेफ महाविद्यालयात रंगला उर्मी महोत्सव

सेंट जोसेफ महाविद्यालयात रंगला उर्मी महोत्सव

sakal_logo
By

मुंबई, ता. १८ : शाळांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धात्मक महोत्सवातून विद्यार्थ्यांतील कलागुणांना वाव मिळतो. ‘उर्मी’सारख्या महोत्सवातून आमचादेखील विकास झाला. आज मी नामांकित संस्थेत व्यवस्थापक असल्याचे श्रेय महाविद्यालयातील प्राध्यापकांना देतो, अशा भावना सेंट जोसेफ महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी सेविका निजाई यांनी व्यक्त केल्या. ज्ञानदीप मंडळ संचालित सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या सेल्फ फायनान्स विभागाच्या वतीने एक दिवसीय ‘उर्मी’ महोत्सवाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने सेविका निजाई बोलत होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेल्फ फायनान्स विभागाच्या समन्वयक डॉ. दीपा लोपीस यांनी केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुभाष डिसोझा यांनी ‘उर्मी’सारख्या महोत्सवातून माणूस घडवला जातो, असे प्रतिपादन केले. यावेळी डॉ. दिनेश सनदी, क्रिस्टोफर मिनेंजीस, सहायक प्रा. संगीता पंडित यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲनी परमार या विद्यार्थिनीने केले.