
गुढीपाडव्याला आम्ही गिरगावकर सन्मान पुरस्काराचे वितरण
मुंबादेवी, ता. १८ (बातमीदार) : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गिरगाव नववर्ष शोभायात्रेचे आयोजन केले जाते. या यात्रेच्या निमित्ताने विविध क्षेत्रांत विशेष भरीव सेवा देणाऱ्या विशेष व्यक्ती, मंडळ, सेवाभावी संस्थांचा मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे. यंदाचा आम्ही गिरगावकर सन्मान २०२३ हा सोहळा केळेवाडी, गिरगाव येथे बुधवारी (ता. २२) सकाळी १० वाजता होणार आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. गजानन रत्नपारखी, डॉ. नागेंद्रनाथ, पत्रकारितेतील नितीन चव्हाण, रोहिणी खाडिलकर-पांडे, आशुतोष पाटील, क्रीडा प्रकारातील दीपा सप्रे, विद्याधर पराडकर, मृणली दिनेश सुर्वे, विशेष सेवेसाठी मुंबई पोलिस परिमंडळ २, महापालिका डी विभाग, यशस्वी उद्योजक, व्यापार प्रकारात श्रीपती ग्रुप, वास्तुदीप डेव्हलपर, परेश खेडेकर, सेवानिवृत्त सहायक पोलिस आयुक्त संजय दिवाडकर, कला (वादन) जगदंब ढोल पथक, सुशांत खानविलकर, आदर्श मंडळांमध्ये गिरगांवचा राजा, ताडदेवचा राजा, गिरगांवचा महाराजा, मोहन बिल्डिंग गणेशोत्सव मंडळ यांचा आम्ही गिरगांवकर सन्मान २०२३ पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.