अंबरनाथ आयटीआयमध्ये उद्या भरती मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबरनाथ आयटीआयमध्ये उद्या भरती मेळावा
अंबरनाथ आयटीआयमध्ये उद्या भरती मेळावा

अंबरनाथ आयटीआयमध्ये उद्या भरती मेळावा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजनेंतर्गत मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्राच्या वतीने अंबरनाथ येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत येत्या सोमवारी (ता. २०) सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत राष्ट्रीय स्तरावरील प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ (अप्रेंटिस) भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात आयटीआयमधील तसेच इयत्ता ८ वी, १० वी, १२ वी उत्तीर्ण किंवा उच्चस्तर आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार एस. एस. जाधव यांनी केले आहे.