विद्यार्थ्यांमध्ये शासकीय योजनांचा जागर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांमध्ये शासकीय योजनांचा जागर
विद्यार्थ्यांमध्ये शासकीय योजनांचा जागर

विद्यार्थ्यांमध्ये शासकीय योजनांचा जागर

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. १८ : अनुसूचित जाती, जमाती व नवबौद्ध घटकांसाठी असलेल्या योजनांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी व या घटकांना त्याचा लाभ कशा प्रकारे घेता येईल, याची माहिती देण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय यांच्यामार्फत जिल्ह्यातील विविध महाविद्यालये व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रदर्शनाद्वारे जनजागृती केली जात आहे. महाविद्यालयांमधील या प्रदर्शनास विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून योजनांचा लाभ कसा घेता येईल, याबद्दल विद्यार्थी जाणून घेत असल्याचे दिसून येत आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने अनुसूचित जाती उपयोजनेतून जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये एकदिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. या प्रदर्शनात सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देण्यात आली. भाईंदर येथील प्रवण पाटील कॉलेज, कल्याणमधील बिर्ला महाविद्यालय, वाशी येथील एफआरसी महाविद्यालय, उल्हासनगर येथील एसटी कॉलेज या महाविद्यालयांमध्ये आतापर्यंत या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनास महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भेट देऊन माहिती घेतली.
सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजना व उपक्रमांची माहिती या प्रदर्शनाच्या माध्यमातून दिली जात आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृत्ती, रमाई आवास योजना, नवउद्योजकांसाठी असलेली स्टँडअप योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन, सैनिकी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शेतकऱ्यांसाठी असलेली मिनी ट्रॅक्टर योजना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अशा विविध योजनांची माहिती देण्यात येत आहे.