कर्मचाऱ्यांच्या संपामुळे रुग्णांची हेळसांड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे रुग्णांची हेळसांड
कर्मचाऱ्यांच्या संपामुळे रुग्णांची हेळसांड

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे रुग्णांची हेळसांड

sakal_logo
By

मुरबाड, ता. १८ (बातमीदार) : सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा मुरबाड ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना फटका बसत आहे. रुग्णालयात डॉक्टरांची संख्या कमी झाल्याने रुग्णांना औषधोपचार करण्यासाठी तासन् तास ताटकळत राहावे लागत आहे.
शनिवारी (ता. १८) सकाळी साडेनऊ वाजल्यापासून साडेअकरा वाजेपर्यंत १२५ लोकांनी बाह्यरुग्ण तपासणीसाठी नोंदणी केली होती. या रुग्णांना तपासणीसाठी मुरबाड ग्रामीण रुग्णालयात दोन डॉक्टर उपलब्ध होते. त्यापैकी एक पुरुष डॉक्टर प्रसूती कक्षात गेल्याने पुरुष रुग्ण ताटकळत उभे राहिले होते; तर एक डॉक्टर महिला कक्षामध्ये होत्या. तेथेही तपासणीसाठी मोठी रांग लागली होती. रुग्णालय अधीक्षक डॉ. प्रसाद भंडारी उपस्थित नसल्याने त्यांच्याशी संपर्क केला असता कर्मचारी संपावर गेल्याने अडचणी आहेत, लोकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

-------------------
रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणीसाठी रुग्णालयात गेले होते. कर्मचारी जागेवर नसल्याने एकडूनतिकडे हेलपाटे मारावे लागले, पण माहिती देणारे कोणी भेटत नाही.
- सरस्वती गायकर, ६० वर्षीय महिला, मुरबाड

--------------------
चक्कर येत असल्याने उपचारासाठी गेलो होतो; पण तीन तास झाले तरी डॉक्टर उपलब्ध झाले नाहीत. ताटकळत उभे राहून इकडूनतिकडे हेलपाटे मारावे लागतात, पण कोणी उत्तर देत नाहीत.
- दत्तात्रय जमदारे, ज्येष्ठ नागरिक, देवगाव