Sun, May 28, 2023

सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Published on : 18 March 2023, 11:20 am
वाडा, ता. १८ (बातमीदार) : ठाणे, पालघर या जिल्ह्यांत विविध गुन्ह्यांची नोंद असलेला व गेल्या दोन वर्षांपासून फरार असलेल्या वाहीद चिखलेकर या सराईत गुन्हेगाराला वाडा पोलिसांनी अटक करण्यात यश आले आहे. आरोपी वाहिद चिखलेकर या सराईत गुन्हेगारावर वाडा, गणेशपुरी, पडघा, भिवंडी व शहापूर या पोलिस ठाण्यात विविध गुन्ह्यांची नोंद आहे. खैर तस्करी प्रकरणात अनेक गंभीर गुन्हे त्याच्या दाखल आहेत. वाडा पोलिसांनी शुक्रवारी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी आज त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला २१ तारखेपर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणाचा वाडा पोलिस अधिक तपास करत आहेत.