Sun, May 28, 2023

विक्रमगडमध्ये कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच
विक्रमगडमध्ये कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच
Published on : 18 March 2023, 11:36 am
विक्रमगड, ता. १८ (बातमीदार) : राज्यातील सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन लागू करावी व विविध मागण्यांसाठी १४ मार्चपासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. या संपामध्ये विक्रमगड तालुक्यातील बहुसंख्य कर्मचारी सहभागी आहेत. नवीन पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ व कर्मचारी समन्वयक समिती विक्रमगड तालुक्याच्या वतीने विक्रमगडमध्ये पंचायत समिती येथून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये बहुसंख्य कर्मचारी सहभागी झाले होते. समन्वयक समितीकडून तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.