कोकण मराठी साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष नंदन नारायण पाटील यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोकण मराठी साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष नंदन नारायण पाटील यांचे निधन
कोकण मराठी साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष नंदन नारायण पाटील यांचे निधन

कोकण मराठी साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष नंदन नारायण पाटील यांचे निधन

sakal_logo
By

विरार, ता. १८ (बातमीदार) : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पालघर जिल्ह्याचे पहिले अध्यक्ष, सोमवंशी क्षत्रीय समाजोन्नती संघाचे माजी उपाध्यक्ष सोमवंशी क्षत्रिय समाज मंडळ संस्थापक अध्यक्ष, लेखक, उत्कृष्ट शिक्षक, कविवर्य नंदन पाटील यांचे आज वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या मागे निवृत्त शिक्षिका पत्नी शालिनी, मुलगा निनाद, मुलगी शिल्पा, जावई, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर आणि अभिनेता गोविंदा यांचे ते शिक्षक होते. नंदन पाटील यांनी क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत सामाजिक क्षेत्रात मानाचे स्थान निर्माण केले होते. कोकण मराठी साहित्य परिषदेची पालघरमध्ये शाखा उघडण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. ते जिल्ह्याचे पहिले अध्यक्ष होते. त्यांच्या कार्यकाळात कोकण मराठी साहित्य परिषदेने नालासोपारा येथे पहिले महिला साहित्य संमेलन आयोजित केले होते. पाटील यांनी मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये अनेक पुस्तके लिहिली आहेत. उर्दू भाषेवरही त्यांचे प्रभुत्व होते. उर्दू भाषेतील कवितांचे ते भाषांतर करत होते. त्यांच्यावर शनिवारी विरार येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.