ड्रग्सची कुरिअरद्वारे तस्करी; दोघे अटकेत

ड्रग्सची कुरिअरद्वारे तस्करी; दोघे अटकेत

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १८ : मुंबईत अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी दोघांना शनिवारी अटक करण्यात आली आहे. दोघेही ड्रग सिंडिकेटचा भाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. या दोघांचाही भारतातून कुरिअरद्वारे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये अमली पदार्थांच्या तस्करीचा डाव होता; परंतु त्यापूर्वी अमली पदार्थविरोधी पथकाने दोघांना बेड्या ठोकल्या. यापूर्वी दोघांनी कुरिअरद्वारे ऑस्ट्रेलिया आणि यूकेला काही प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी केली होती. मुंबईतून दर आठवड्याला १० किलो केटामाईन ड्रग्सची विदेशात तस्करी केली जात होती. हे अमली पदार्थ गुजरातमधून मुंबईत आणण्यात येत होते. तेथून पॅक करून परदेशात पाठवले जात होते. प्राथमिक तपासात हे तस्कर आंतरराष्ट्रीय सिंडिकेटचा भाग असून ते ड्रग्जचा पुरवठा करण्यासाठी मुंबईत आले असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com