Fri, June 9, 2023

शेजाऱ्यावर चाकूने हल्ला
शेजाऱ्यावर चाकूने हल्ला
Published on : 18 March 2023, 2:35 am
मुंबई, ता. १८ : पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पतीने शेजाऱ्याच्या हत्येचा प्रयत्न केल्याची घटना चुनाभट्टीत घडली आहे. या घटनेत शेजारी गंभीर जखमी झाला आहे. रमेश मैत्री आणि त्यांची पत्नी मुंबईतील चुनाभट्टी परिसरात राहतात. शुक्रवारी (ता. १७) रात्री साडेबारच्या सुमारास रमेश यांचा पत्नीशी वाद झाला. या वादातून रमेशने पत्नीला मारहाण केली. मारहाणीपासून बचावासाठी तिने शेजारी रामकुमार यांना बोलावले. रामकुमार आणि पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय रमेशच्या मनात होता. या संशयामुळे रमेश रामकुमारवर चाकूने हल्ला करून पसार झाला. या प्रकरणी फिर्यादी पत्नीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.