नायजेरीयन नागरीकांना तळोज्यातून अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नायजेरीयन नागरीकांना तळोज्यातून अटक
नायजेरीयन नागरीकांना तळोज्यातून अटक

नायजेरीयन नागरीकांना तळोज्यातून अटक

sakal_logo
By

पनवेल, ता. १९ (वार्ताहर) : तळोजा भागात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या तीन नायजेरियन नागरिकांना तळोजा पोलिसांनी अटक केली आहे. इमेनेकि बॉन्नीफेस (४५), अमेची अजरेरे (४६) व मिका ग्रेस (४५) अशी या तिघांची नावे असून त्यांच्याकडे पासपोर्ट आणि व्हिसा नसल्याचे चौकशीत आढळून आले आहे.
तळोजा फेज-१ मध्ये नायजेरियन नागरिक बेकायदा वास्तव्य करत असल्याची माहिती तळोजा पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे तळोजा पोलिसांच्या पथकाने बुधवारी (ता. १५) दुपारी तळोजा फेज-१ मधील श्रीकृपा रेसिडेन्सी या इमारतीतील रुम नं. १०१ मध्ये जाऊन पडताळणी केली होती. यावेळी घरामध्ये राहणाऱ्या तिघा नायजेरियन नागरिकांकडे पासपोर्ट तसेच व्हिजाबाबत विचारपूस केली असता त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे नसल्याचे आढळून आले. त्यामुळे तळोजा पोलिसांनी तिघांविरोधात परदेशी नागरिक अधिनियम कलम १४ अ व पासपोर्ट अधिनियम कलम १२ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली आहे. विशेष म्हणजे, यातील एका नायजेरीयनला मुंब्रा पोलिसांनी गेल्या वर्षी अमली पदार्थाच्या तस्करीत अटकदेखील केली आहे. त्यामुळे शहरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.