Sat, March 25, 2023

सांताक्रूझमधून ४८ लाखांचे ड्रग्स जप्त
सांताक्रूझमधून ४८ लाखांचे ड्रग्स जप्त
Published on : 18 March 2023, 3:58 am
मुंबई, ता. १८ : मुंबईतील सांताक्रूझ परिसरात अमली पदार्थ तस्करी आणि विक्रीप्रकरणी शनिवारी पाच जणांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. या सर्वांकडून ४८ लाख रुपयांचे अमली पदार्थ पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते.
आशीष राठोड, इद्रिस मुनावर, नीरव निषाद, अश्रफ कुरेशी, सिराज शेख अशी अटक पाच जणांची नावे आहेत. गुन्हे शाखेने सांताक्रूझ येथील रॉड्रिक्स चाळीत छापा टाकून ही कारवाई केली. छाप्यादरम्यान १.६२ किलो चरस, ३५३ ग्रॅम गांजा आणि जुगार खेळण्यासाठी वापरलेले इतर साहित्य जप्त केले.