सर्वेक्षणादरम्यान लाचप्रकरणात कारवाईचे आदेश

सर्वेक्षणादरम्यान लाचप्रकरणात कारवाईचे आदेश

मुंबई, ता. १८ : मागाठणे येथे झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण करताना नागरिकांकडून कर्मचारी लाच मागत असल्याबाबत भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांच्या आरोपासंदर्भात तत्काळ कारवाई करण्याचे आदेश मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. दरेकर यांनी शुक्रवारी (ता. १७) विधान परिषदेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करत ही माहिती दिली. जाणुपाडा, पांडे कम्पाऊंड, चिखलवाडी येथे बायोमेट्रिक सर्वेक्षणादरम्यान पैसे मागणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करून पैसे परत करण्याची मागणी त्यांनी केली. याप्रकरणी संबंधित यंत्रणेला तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले जातील. अशा पद्धतीने सर्वसामान्यांना कुणी नाहक वेठीस धरत असेल, तर त्यांची गय केली जाणार नाही, असे उत्तर शंभूराज देसाई यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com