Wed, March 29, 2023

कल्याण डेपोत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा जल्लोष
कल्याण डेपोत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा जल्लोष
Published on : 19 March 2023, 10:35 am
कल्याण, ता. १९ (बातमीदार) : एसटी बसमधून महिला प्रवाशांना तिकीटदरात ५० टक्के सवलत राज्य सरकारने जाहीर केली आहे. त्याची अंमलबजावणी शुक्रवार (ता. १७) पासून सुरू केल्याने महिलावर्गात आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी कल्याण एसटी डेपोत जल्लोष साजरा करत प्रवास करणाऱ्या महिलांचे मिठाई वाटून स्वागत केले. मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यात २०२३-२४ या वर्षासाठी महिलांना एसटी बसमधील तिकीट दरात ५० टक्के सवलत देणारी महिला सन्मान योजना जाहीर केली होती. त्यामुळे अर्धे तिकीट काढून महिलांना प्रवास करता येणार असून त्याची अंमलबजावणी शुक्रवारपासून कल्याण एसटी डेपोमध्येही सुरुवात झाली असून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.