कौशल्य विकास योजनांमार्फत रोजगार वाढीसाठी प्रयत्न : लोढा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कौशल्य विकास योजनांमार्फत
रोजगार वाढीसाठी प्रयत्न : लोढा
कौशल्य विकास योजनांमार्फत रोजगार वाढीसाठी प्रयत्न : लोढा

कौशल्य विकास योजनांमार्फत रोजगार वाढीसाठी प्रयत्न : लोढा

sakal_logo
By

मुंबई, ता. १९ : राज्यात कौशल्य विकास विभागामार्फत विविध योजना राबवून त्यामार्फत बेरोजगारीची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधान परिषदेत सांगितले.

अभिजित वंजारी यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्यावर लोढा म्हणाले की, रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी १,२०० कोटी रुपये खर्च करून ४१८ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. स्थानिक पातळीवर कोणते अभ्यासक्रम महत्त्वाचे आहेत, याबाबत स्थानिकांचे मत विचारात घेऊन एक, दोन, तीन महिन्यांचे विविध अभ्यासक्रम तयार करण्यात येत आहेत. कमी लोकसंख्येच्या पाचशे गावांमध्ये कौशल्य विकास केंद्रे उभारण्यात येत आहेत. नोंदणी न केलेल्या बेरोजगारांना या कौशल्य विकास केंद्रांचा लाभ होईल.

रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून, तसेच विविध आस्थापनांशी सामंजस्य करारांच्या माध्यमातून ४२ हजार जणांना रोजगार उपलब्ध झाले आहेत. यापुढे नवीन ॲप विकसित करून त्यावर रिक्त जागांची माहिती देण्याची सूचना कंपन्यांना करण्यात येईल. राज्यात २०० कोटी रुपयांचा नावीन्यता निधी तयार करण्यात आला असून यातील २० टक्के निधी आयटीआयसाठी; तर २० टक्के निधी महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला असल्याची माहितीही लोढा यांनी दिली.