
जोगेश्वरीत चित्रफीत स्पर्धा
जोगेश्वरी, ता. २० (बातमीदार) : हिंदू नववर्षारंभानिमित्त (गुढीपाडवा) जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातर्फे बुधवारी (ता. २२) शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेची आकर्षक चित्रफीत तयार करणाऱ्यांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून स्पर्धेमधून तीन विजेत्यांची निवडही करण्यात येणार असून त्यांना आकर्षक पुरस्कार देण्यात येणार आहेत. तसेच संपूर्ण दिवसभर कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे. अंधेरी पूर्वेतील पी.एम.जी.पी कॉलनी, पूनम नगर येथून सकाळी ७ वाजता शोभायात्रेस सुरुवात होणार आहे. ही शोभायात्रा म्हाडा कॉलनी (कोकणनगर), सर्वोदयनगर, शेरे ए पंजाब कॉलनी, गुरुद्वारा, आघाडीनगर, कांतिलाल कम्पाऊंड, नर्माण पॅलेस, मेघवाडी पोलिस ठाणे (आयकर वसाहत), स्वामी विवेकानंद शाळा, शनी महात्मा रोड मेघवाडी (शाखा क्र. ७७), बी. टी. रोड मार्ग, जनशक्ती चौकीसमोरील रस्त्यामार्गे समर्थनगर, स्वप्नपूर्ती, ठाकूरनगर, महाराज भुवन, शाखा क्र. ७८ (धोबीघाट), संजयगांधी नगर, जोगेश्वरी स्टेशन रोड, सुभाष रोड, मकरानी पाडा, बांद्रेकर वाडी, भवानी चौक, जे.व्ही.एल.आर. जंक्शन (आर.टी.ओ. ऑफिस) प्रतापनगर, रामवाडी, दत्त टेकडी, इच्छापूर्ती गणेश मंदिर येथे शोभायात्रेची समाप्ती करण्यात येणार आहे.