संभाजी महाराजांचे भव्य स्मारक संगमेश्वरला होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संभाजी महाराजांचे भव्य स्मारक संगमेश्वरला होणार
संभाजी महाराजांचे भव्य स्मारक संगमेश्वरला होणार

संभाजी महाराजांचे भव्य स्मारक संगमेश्वरला होणार

sakal_logo
By

मुंबई, ता. १९ : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक करण्यासाठी त्याचा आराखडा मुख्यमंत्र्यांसमोर ठेऊन याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत सांगितले.

विधान परिषदेतील भाजप प्रतोद प्रसाद लाड यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेतील भाषणादरम्यान सभागृहात काही मागण्या केल्या होत्या. त्यात संभाजी महाराजांच्या स्मारकाप्रमाणेच रॉयल्टीच्या माध्यमातून सरकारचे उत्पन्न वाढवण्याबाबतचेही मुद्दे होते. संभाजी महाराजांना जिथे मोगलांनी ताब्यात घेतले होते, त्या शौर्यस्थळावर संभाजी महाराजांचे भव्य दिव्य स्मारक व्हावे, अशी मागणी लाड यांनी केली होती. त्यावर केसरकर म्हणाले की, ‘स्मारकाच्या संदर्भात राज्य सरकार अतिशय सकारात्मक असून, स्मारकाचा आराखडा बनवून, तो मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येईल व त्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच रॉयल्टीच्या माध्यमातून राज्याचे उत्पन्न कसे वाढवता येईल, यावरही विचार करावा, अशा सूचनाही लाड यांनी केल्या होत्या. त्याबाबत केसरकर म्हणाले की, वसंतराव नाईक यांच्या स्मारकाच्या उभारणीसाठी पुढाकार घेण्यात येईल. त्याचप्रमाणे रॉयल्टी वाढवण्याबाबत करण्यात आलेल्या सूचनेचा विचार करून, प्रसाद लाड आणि इतर संबंधित आमदारांची बैठक घेऊन राज्याच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल.

विधान परिषदेचे माजी सभापती स्व. शिवाजीराव देशमुख यांच्या कोकरूड (जि. सांगली) येथील स्मारकासाठी निधीची तरतूद करावी, अशी विनंतीही लाड यांनी केली होती. त्यानुसार राज्य सरकारने २० कोटी रुपयांची तरतूद केल्याचेही केसरकर यांनी सांगितले.