कळंबोलीतून बाल कामगारांची सुटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कळंबोलीतून बाल कामगारांची सुटका
कळंबोलीतून बाल कामगारांची सुटका

कळंबोलीतून बाल कामगारांची सुटका

sakal_logo
By

पनवेल, ता. १९ (वार्ताहर) : नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने कळंबोली, सेक्टर-१६ मधील एका ढाब्यावर छापा मारून दोन बालकामगारांची सुटका केली आहे. तसेच बाल कामगारांना कमी वेतनात अतिश्रमाचे काम देऊन त्यांना राबवून घेणाऱ्या ढाबामालकांवर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे.
कळंबोली रोडपाली परिसरातील एका ढाब्यामध्ये बालकामगारांना कामावर ठेवण्यात आल्याची माहिती युवा चाईल्ड लाईन या हेल्पलाईनकडून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल आहेर यांनी ढाब्यावर कारवाई करण्याच्या सूचना पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक निलम पवार व त्यांच्या पथकाने गुरुवारी (ता.१६) कळंबोलीतील रोडपाली सेक्टर-१६ मधील संतोष ढाब्यावर छापा मारला होता. या वेळी ढाब्यामध्ये १३ ते १६ वयोगटातील दोन अल्पवयीन मुले जेवण देणे, बनवणे, मच्छी फ्राय करणे, तसेच भांडी सफाईची कामे करत असल्याचे आढळून आले. त्यामुळे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने ढाब्याचा मालक पलटू यादव (४०) याला बालकांची काळजी व संरक्षण, बाल आणि किशोरवयीन कामगार नियमन व निर्मूलन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे.