Sat, June 3, 2023

एटीएम मशिनमधून दहा हजारांची चोरी
एटीएम मशिनमधून दहा हजारांची चोरी
Published on : 19 March 2023, 11:13 am
कामोठे (बातमीदार) : सेक्टर ३६ येथील शरद सहकारी बँकेच्या एटीएम मशीनमधून एका व्यक्तीने दहा हजारांची चोरी केली आहे. याबाबत कामोठे पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. कामोठे नोडमध्ये चोरी, फसवणुकीच्या प्रकारांत वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिक धास्तावले असून सेक्टर ३६ येथील अंबे श्रद्धा सोसायटीच्या आवारात असलेल्या शरद सहकारी बँक लिमिटेडच्या एटीएम सेंटरमधून एका व्यक्तीने दहा हजारांची रक्कम चोरल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत कामोठे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.