वृत्तपत्र छपाईचे विद्यार्थ्यांना कुतूहल

वृत्तपत्र छपाईचे विद्यार्थ्यांना कुतूहल

नवीन पनवेल, ता. १९ (वार्ताहर)ः आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तळोजा येथील ‘सकाळ’च्या प्रिंटिंग प्रेसला शनिवारी (ता. १८) शैक्षणिक सहलीनिमित्त भेट दिली. या वेळी वृत्तपत्राचे तांत्रिक तसेच छापील कामकाज जाणून घेण्याची उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये दिसून आली.
वृत्तपत्र निर्मितीची माहिती शालेय विद्यार्थ्यांनादेखील मिळावी, या हेतूने विविध शाळांच्या शैक्षणिक सहली ‘सकाळ’च्या प्रिंटिंग प्रेसला भेट देत असतात. त्याच अनुषंगानेच वासुदेव बळवंत फडके विद्यालयातील विद्यार्थ्यांची एकदिवसीय शैक्षणिक सहल काढण्यात आली होती. या वेळी शाळेतील साधारण दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांनी वृत्तपत्र छपाईमधील तंत्रज्ञान बारकाईने समजून घेतले. या वेळी वृत्तपत्राच्या छापील तंत्रज्ञानाविषयी प्रिंटिंग प्रेसचे व्यवस्थापक कुणाल पाटील यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच पुनर्प्रक्रिया केलेल्या कागदाचा वापर, रंगसंगती, छापण्याचे तंत्र व देखभाल-दुरुस्तीची माहिती घेतली. यंत्रणेसोबत विद्यार्थी तसेच शिक्षकांच्या विविध शंकांचे निरसनही या वेळी करण्यात आले. या वेळी शाळेच्या प्राचार्या समिता सोमन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रीती धोपाटे, अनुजा जोशी, संगीता गोरे, पिंकी भिसे, प्रचीती तळवळकर, बबन उघडे, प्रियंका भोसले, कांचन थोरात या शिक्षकांनी सहलीत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
----------------------------------------
सकाळी हातात पडणारे वर्तमानपत्र कसे छापले जाते, त्याचे तांत्रिक तसेच छपाईचे कामकाज कशा प्रकारे चालते याबाबत विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्येही नेहमीच उत्सुकता असते. ‘सकाळ’ समूहाच्या सहकार्यामुळे हे बारकावे पाहावयास मिळाले.
- समिता सोमण, मुख्याध्यापिका, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, नवीन पनवेल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com