Tue, May 30, 2023

महिलांनी सवलतीचा लाभ घेत केला प्रवास
महिलांनी सवलतीचा लाभ घेत केला प्रवास
Published on : 19 March 2023, 10:55 am
सरळगाव, ता. १९ (बातमीदार) : एसटी प्रवासात ५० टक्के सवलतीचा फायदा घेत शेकडो महिलांनी भाजपाच्या महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षा शीतल तोंडलीकर यांच्यासमवेत प्रवास करून योजनेचा लाभ घेतला. राज्य सरकारने जाहीर केलेल्या महिलांसाठी ५० टक्के पैशात प्रवास या सवलतीचा फायदा महिला घेऊ शकत असल्याने महिलावर्गात आनंदाचे वातावरण आहे. भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या आदेशानुसार या योजनेचा फायदा घेत महिला मोर्चाच्या अध्यक्षा तोंडलीकर यांनी अनेक वर्षे एसटी प्रवासापासून वंचित असलेल्या महिलांना बरोबर घेऊन सवलतीच्या दरात प्रवास केला. या वेळी जिल्हा सरचिटणीस जयश्री चव्हाण, भिवंडी ग्रामीण मंडळ अध्यक्षा व माजी पंचायत समिती सभापती रविना जाधव, सुनंदा सोणावणे सहभागी झाल्या होत्या.