बकरा विक्रेत्याची फसवणूक करणाऱ्याला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बकरा विक्रेत्याची फसवणूक करणाऱ्याला अटक
बकरा विक्रेत्याची फसवणूक करणाऱ्याला अटक

बकरा विक्रेत्याची फसवणूक करणाऱ्याला अटक

sakal_logo
By

मानखुर्द (बातमीदार) : गोवंडी येथील बकऱ्याच्या मंडईत विक्रेत्याची फसवणूक करणाऱ्या विक्रेत्याला देवनार पोलिसांनी अटक केली. यासीन शेख (वय ३५) असे त्याचे नाव असून त्याच्या साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत. त्याने बकरा विक्रेत्याकडून दोन बकरे खरेदी करून २० हजार रुपये ऑनलाईन पाठवल्याचा बनाव केला होता. देवनारच्या पशू वधगृहाच्या आवारात बकऱ्याची मंडई भरते. त्या मंडईत जाफर कुरेशी हे बकऱ्याची खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. मंगळवारी (ता. १४) सायंकाळी त्यांच्याकडून यासिनने दोन बकऱ्यांची खरेदी केली. त्या बदल्यात त्याने २० हजार रुपये जापरचे मित्र मोसिनच्या मोबाईलवर पाठवल्याचा बनाव केला. पैसे न पाठवता पैसे पाठवल्याचा संदेश त्याने पाठवला. खात्यात पैसे जमा झाले नसल्याचे लक्षात येताच फसवणूक झाली असल्याचे जापरला कळले. त्याने देवनार पोलिस ठाणे गाठत त्याच्याविरोधात तक्रार केली.