Sun, June 4, 2023

मुलुंडमधील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
मुलुंडमधील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
Published on : 19 March 2023, 10:33 am
मुलुंड (बातमीदार) : माजी नगरसेवक प्रकाश गंगाधरे आणि माजी नगरसेविका समिता कांबळे यांच्या प्रयत्नाने शनिवारी (ता. १८) मुलुंड पश्चिमेकडील कस्तुरबा रस्त्याचे डांबरीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी वॉर्ड क्र. १०४ अध्यक्ष राजेंद्र मोहिते, राजेंद्र रहाटे, प्रकाश मोटे, अशोक साळवी, अल्पेश ढेढिया, पी. आर. राव, संजय राजगोर, सानिका चव्हाण, सविता राजपूत, भावना शाह, जयश्री बलेगर आदी मान्यवर उपस्थित होते.