खैरपाडा येथील तोडक कारवाई विरोधात श्रमजीवी संघटना आक्रमक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खैरपाडा येथील तोडक कारवाई विरोधात श्रमजीवी संघटना आक्रमक
खैरपाडा येथील तोडक कारवाई विरोधात श्रमजीवी संघटना आक्रमक

खैरपाडा येथील तोडक कारवाई विरोधात श्रमजीवी संघटना आक्रमक

sakal_logo
By

विरार, ता. १९ (बातमीदार) : वसई विरार महानगरपालिका हद्दीतील खैरपाडा कणेर नालेश्र्वर येथील बांधकाम तोडल्याच्या विरोधात श्रमजीवी संघटना आक्रमक झाली आहे. यासंदर्भात श्रमजीवी संघटनेच्या कार्याध्यक्षा स्नेहा दुबे - पंडित यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने वसई तहसीलदार उज्ज्वला भगत यांची भेट घेतली. शासकीय जमिनीवर अनधिकृत बांधकामे सुरू असताना त्या भागातील मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक काय करत होते. सरकारी जमिनीवरील होणारी अवैध बांधकाम थांबविण्याची तसेच त्या जमिनीचे संरक्षण करण्याची जबाबदारी पार न पाडणाऱ्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करावी. तसेच शासकीय जागेवर अनधिकृत बांधकाम करणाऱ्या भूमाफियांवर गरिबांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी या वेळी शिष्ट मंडळाने तहसीलदारांकडे केली. यावर संबंधित बेकायदेशीर बांधकाम प्रकरणात चौकशी करून पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश देण्याचे आश्वासन तहसीलदारांनी दिले. या शिष्टमंडळात श्रमजीवी संघटनेच्या स्नेहा दुबे-पंडित यांच्यासह पालघर जिल्हा अध्यक्ष सुरेश रेंजड, पालघर जिल्हा सचिव तसेच जिल्हा परिषद सदस्य गणेश उंबरसाडा, जिल्हा उपाध्यक्ष रामा रोज, वसई तालुका अध्यक्ष आत्माराम ठाकरे, वसई सचिव एकनाथ कलिंगडा व दिलीप लोंढे आदी उपस्थित होते.