जिल्ह्यासह विधानसभा क्षेत्रात शिवसेनेची मोर्चेबांधणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यासह विधानसभा क्षेत्रात शिवसेनेची मोर्चेबांधणी
जिल्ह्यासह विधानसभा क्षेत्रात शिवसेनेची मोर्चेबांधणी

जिल्ह्यासह विधानसभा क्षेत्रात शिवसेनेची मोर्चेबांधणी

sakal_logo
By

मोखाडा, ता. १९ (बातमीदार) : शिवसेना पक्ष आणि निशाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाने दिले आहे. त्यानंतर शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू झाले आहे. पक्षाचा विस्तार जिल्ह्यात तळागाळापर्यंत करण्यासाठी नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यादृष्टीने विक्रमगड विधानसभा क्षेत्रात हालचाली सुरू झाल्या आहेत. विक्रमगड विधानसभा संघटकपदी मोखाडा पंचायत समितीचे उपसभापती प्रदिप वाघ तर जव्हारचे माजी पंचायत समिती सदस्य विनायक राऊत यांची जव्हार तालुकाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ठाणे आणि पालघर जिल्ह्यावर एकहाती वर्चस्व असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता पक्षवाढीसाठी लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी पालघर जिल्ह्यातील मनोर येथे पालघर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक यांनी शिवसैनिकांचा मेळावा देखील घेतला आहे. विक्रमगड विधानसभा क्षेत्रात महत्त्वाचे विधानसभा संघटक आणि जव्हार तालुका प्रमुख पद रिक्त होते. पक्ष वाढीसाठी आणि आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, विक्रमगड विधानसभा संघटक पदी मोखाडा पंचायत समिती चे उपसभापती प्रदिप वाघ तर जव्हार चे माजी पंचायत समिती सदस्य विनायक राऊत यांची जव्हार तालुका प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे विक्रमगड विधानसभा क्षेत्रात शिवसेनेची ताकद वाढली आहे.
दरम्यान, आपण बाळासाहेबांचे विचार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवणार आहे. शिवसेना तळागाळापर्यंत पोहोचवून, संघटना वाढवून पक्ष मजबूत करणार असल्याचे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
...
मोखाडा : शिवसेना पालघर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक यांनी विक्रमगड विधानसभा संघटक पदाचे नियुक्ती पत्र प्रदिप वाघ यांना दिले.