Tue, June 6, 2023

स्कायवॉकचा निखळलेला खांब अखेर पालिकेने काढला
स्कायवॉकचा निखळलेला खांब अखेर पालिकेने काढला
Published on : 19 March 2023, 10:37 am
विरार, ता. १९ (बातमीदार) : वादळी वाऱ्यामुळे स्कायवॉकचा आधारासाठी असणारा खांब निखळला होता. निखळलेला खांब बाजूला असलेल्या इमारतीच्या खिडकीवर लटकत होता. हा खांब निसटून खाली पडल्यास मोठा अनर्थ होणार होता. यासंबंधी रविवारी (ता. १९) दैनिक सकाळमध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल घेत वसई-विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार आणि बांधकाम अभियंता राजेंद्र लाड यांनी रविवारी तातडीने कारवाई करून पालिकेने लटकणारे खांब आणि त्याच्या बाजूचा पडण्याच्या अवस्थेत आलेला खांबही काढून टाकला आहे. आता एमएमआरडीए या स्कायवॉकच्या सुरक्षतेसाठी काय करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.