एनएमएमटीच्या कर्मचाऱ्यांचे आमदारांना गाऱ्हाणे

एनएमएमटीच्या कर्मचाऱ्यांचे आमदारांना गाऱ्हाणे

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २० ः नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमामध्ये अभियांत्रिकी विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या श्रमिक सेना संघटनेच्या शेकडो कर्मचाऱ्यांनी बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांची निवासस्थानी भेट घेतली आहे. या वेळी गेल्या १२ वर्षांपासून परिवहन सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे कायमस्वरूपी घेण्यात येईल, असे आश्वासन आमदार मंदा म्हात्रे यांनी कर्मचाऱ्यांना दिले.
नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमात अभियांत्रिकी विभागात गेल्या १२ वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मुलाखती घेऊन नियुक्त करण्यात आले आहे. यामध्ये मॅकेनिकल ३६ व मदतनीस ५४ असे कर्मचारी कार्यरत आहेत. श्रमिक सेना संघटना युनियनमध्ये काम करत असूनही संघटनेकडून त्यांना न्याय मिळालेला नाही. त्यामुळे महापालिकेतील कर्मचाऱ्यांप्रमाणेच एनएमएमटीतील या कर्मचाऱ्यांनाही कायमस्वरूपी करावे, अशी मागणी केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com