संशोधनातून देशाची प्रगती साधा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संशोधनातून देशाची प्रगती साधा
संशोधनातून देशाची प्रगती साधा

संशोधनातून देशाची प्रगती साधा

sakal_logo
By

पालघर, ता. २० (बातमीदार) : विद्यार्थ्यांनी मूलभूत संशोधन करून आपल्या समाजाची आणि देशाची प्रगती साधली पाहिजे, असे प्रतिपादन मुंबई येथील ठाकूर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वैशाली चक्रवर्ती यांनी केले. सोनपंत दांडेकर महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाने रसायनशास्त्रातील अलीकडील प्रगती या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचा उद्‍घाटन सोहळा डॉ. चैताली चक्रवर्ती यांच्या हस्ते पार पडला.
सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जी. डी. तिवारी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. पालघरसारख्या दुर्गम भागात आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषद आयोजित केल्याबद्दल आणि संशोधकांना त्यांचे संशोधन कार्य मांडण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल रसायनशास्त्र विभागाचे त्यांनी अभिनंदन केले. प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी संशोधन ही काळाची गरज आहे, असे सांगून आजच्या तरुण पिढीला संशोधनाचे महत्त्व पटवून दिले.
या विज्ञान परिषदेमध्ये कॉलेजमधील संशोधक विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य आणि विद्यार्थ्यांसह १७३ जणांनी सहभाग घेतला. विज्ञान परिषदेचे निमंत्रक डॉ. सुहास जनवारकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. दिलीप यादव यांनी महाविद्यालयाबद्दल माहिती दिली. प्रा. सिद्धी म्हात्रे सूत्रसंचालन; तर डॉ. वैभव मोरे यांनी आभार मानले.

-------------------
मान्यवरांकडून, तज्ज्ञांकडून मार्गदर्शन
मुंबई विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील आमंत्रित संशोधक आणि प्रा. डॉ. वी. आर. पाटील यांनी नॅनो टेक्नॉलॉजी आणि आधुनिक नवीन संशोधन या विषयावर त्यांचे विचार मांडले. नॅनो टेक्नॉलॉजीमधील आधुनिक शोधाचा भविष्यात कसा फायदा होईल, याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आयसीटी मुंबई येथील संशोधक प्राध्यापक अतुल चासकर यांनी कार्बोनील रसायनशास्त्राबद्दल अभ्यासपूर्ण मांडणी केली. स्कूल ऑफ बेसिक सायन्सेस अँड रिसोर्स जयपूर नॅशनल युनिव्हर्सिटी जयपूरचे प्राध्यापक आर. एस. लोखंडे यांच्या व्याख्यानाने या कार्यक्रमाची सांगता झाली. विषय कितीही कठीण असला तरी सतत प्रयत्न करून त्या विषयात आपल्याला विशेष प्रावीण्य मिळवता येते असे त्यांनी सांगितले.