Sun, May 28, 2023

वरळी येथे अपघातात
महिलेचा जागीच मृत्यू
वरळी येथे अपघातात महिलेचा जागीच मृत्यू
Published on : 19 March 2023, 12:29 pm
मुंबई, ता. १९ : वरळी सी फेस येथे भरधाव वेगाने येणाऱ्या मोटारीने दिलेल्या धडकेत ४२ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. राजलक्ष्मी राजकृष्णन असे मृत महिलेचे नाव असून अपघातात गाडीचा चालकही जखमी झाला आहे. या प्रकरणी वरळी पोलिसांनी चालक सुमेर मर्चंट (रा. ताडदेव, वय २३) याला अटक केली आहे. वरळी डेअरीजवळ सकाळी साडेसहाच्या सुमारास ही महिला चालत जात होती. त्या वेळी भरधाव वेगाने येणाऱ्या मोटारीच्या चालकाचे नियंत्रण सुटल्यामळे ती थेट महिलेला धडकली. अपघातात महिला दूरवर फेकली गेली. त्यानंतर गाडी तेथील दुभाजकालाही धडकली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेला स्थानिकांनी पोलिसांच्या मदतीने नायर रुग्णालयात हलवले; मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.