Wed, June 7, 2023

नैराश्यातून व्यावसायिकाची आत्महत्या
नैराश्यातून व्यावसायिकाची आत्महत्या
Published on : 19 March 2023, 12:30 pm
मानखुर्द, ता. १९ (बातमीदार) : गोवंडीच्या शिवाजी नगर बस स्थानकालगत असलेल्या शास्त्रीनगर परिसरात शनिवारी (ता. १८) सायंकाळी एका व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत माहिती मिळताच तात्काळ त्याचा भाऊ व मित्राने त्याला गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात उपचारांसाठी नेले. तेथे डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. शिवाजी नगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करत मृतदेह घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. शास्त्री नगर परिसरात राहणाऱ्या मिराज चामिराज अन्सारी (वय ३९) याचा परिसरात पादत्राणे बनवण्याचा कारखाना आहे. शनिवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास त्याने कारखान्यात नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवाजी नगर पोलिसांनी दोन पंचांसमक्ष पंचनामा केला आहे.