एच३ एन२ नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन सतर्क | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एच३ एन२ नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन सतर्क
एच३ एन२ नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन सतर्क

एच३ एन२ नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन सतर्क

sakal_logo
By

ठाणे, ता. १९ (वार्ताहर) : सध्या एच३ एन२ हा नवा व्हेरियंट वेगाने पसरत असतानाच कोरोनानेही डोके वर काढलेले आहे. त्यामुळे लोकांनी घाबरून जाण्याची आवश्‍यकता नाही. नागरिकांनी पुन्हा मास्क, सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर वापरावर लक्ष केंद्रित करावे. या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क असल्याची प्रतिक्रिया ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.
जिल्ह्यात सद्यस्थितीला एच३ एन२चे ११ रुग्ण आढळले आहेत; मात्र ते अतिगंभीर नाहीत; तर जिल्ह्यात १३३ कोरोनाचे रुग्ण आहेत. मात्र तेदेखील रुग्णालयात दाखल नसून घरीच उपचार घेत आहेत. सध्या सिव्हिल रुग्णालयाचे स्थलांतर मेंटल रुग्णालयाच्या जागेवर होत आहे; तरीही नागरिकांनी चिंता करण्याचे कारण नाही. फक्त सतर्क राहत अत्यावश्यक उपाययोजना पुन्हा अंमलात आणणे गरजेचे असल्याचे मत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पवार यांनी व्यक्त केले आहे.
राज्यातील बदलत्या वातावरणामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिक आजारी पडत आहेत. अशा वेळी इन्फ्ल्यूएझचा एच३ एन२ व कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर करत सोशल डिस्टन्स पाळावे, यामुळे रुग्णांच्या संख्येला आणि आजाराला आळा घालण्यात यश मिळेल. या सर्व साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा रुग्णालय सतर्क आणि सक्षम असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी या वेळी सांगितले.