ठाण्यात दुकानाला आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यात दुकानाला आग
ठाण्यात दुकानाला आग

ठाण्यात दुकानाला आग

sakal_logo
By

ठाणे, ता. १९ (वार्ताहर) : गडकरी रंगायतन येथील मातृकृपा सोसायटीच्या तळमजल्यावर असलेल्या आईस्क्रीमच्या दुकानाला रविवारी पहाटे आग लागल्याची घटना घडली. या आगीत दुकानातील सर्व साहित्य जळाले तर आगीच्या झळांनी पार्किंग केलेल्या चारचाकींचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ठाण्याच्या गडकरी रंगायतन तलावपाळी येथील आम्रपाली बार ॲण्ड रेस्टॉरंटसमोर असलेल्या मातृकृपा सोसायटीच्या तळमजल्यावर कुल्फी हाऊस नावाच्या आईसक्रीमच्या दुकानाला ही आग लागली. हे दुकान राहुल गुप्ता यांच्या नावावर असून या आगीत दुकानातील फ्रीज, कागदी द्रोण इतर सर्व साहित्य आगीत जळाले आहे; तर दुकानाच्या समोर पार्किंग केलेली एक चाकचाकीही आगीच्या ज्वाळांनी क्षतिग्रस्त झाली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नौपाडा पोलिस कर्मचारी, महावितरण कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांनी मदतकार्य करीत आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.