महिलांना हाफ तिकीच्या सवलतीमूळे एसटीचा गल्ला फुल्ल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलांना हाफ तिकीच्या सवलतीमूळे एसटीचा गल्ला फुल्ल
महिलांना हाफ तिकीच्या सवलतीमूळे एसटीचा गल्ला फुल्ल

महिलांना हाफ तिकीच्या सवलतीमूळे एसटीचा गल्ला फुल्ल

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ ः राज्य सरकारने अर्थसंकल्पी अधिवेशनात एसटीत महिला प्रवाशांना ५० टक्के प्रवासी सवलत देण्याची घोषणा केल्यानंतर १७ मार्चपासून लागू झालेल्या प्रवासी सवलतीला राज्यातील महिलांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. १८ मार्च रोजी एकाच दिवसामध्ये राज्यभरात ११ लाख ३० हजार २८३ महिलांनी महिला सन्मान योचनेच्या माध्यमातून ५० टक्के तिकीट दरात सवलतीचा लाभ घेऊन प्रवास केला आहे. त्यामुळे फक्त महिलांच्या प्रवासामुळे एका दिवसात ५ कोटी ६८ लाखाचा गल्ला एसटीने जमवला आहे.

१८ मार्च रोजी राज्यभरात एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांचे सर्वाधिक संख्या आढळून आली असून, एसटी महामंडळाने एका दिवसात नगद २ कोटी ८४ लाख रुपये उत्पन्न मिळाले असून, तेवढेच राज्य सरकार कडून मिळणारे ५० टक्के प्रतिपूर्ती रक्कम मिळून ५ कोटीची कमाई झाली आहे. त्यामुळे एसटी महामंडळासाठी महिला सन्मान योजना फळदायी ठरणार आहे.
---------------
अशी असते सवलत योजना
राज्य सरकार घोषणा करत असलेल्या सवलतीच्या दरातील योजना एसटी महामंडळाच्या सार्वजनिक प्रवासी सेवेतून चालवते. आतापर्यंत सुमारे २९ प्रवासी सवलत योजना एसटी महामंडळात सुरू आहे. त्यामध्ये नव्याने महिला सन्मान योजनेची घोषणा करण्यात आली आहे. महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत दिली आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाकडून ५० टक्के म्हणजेच हाफ तिकीट महिला प्रवाशांची घेतली जाणार आहे; तर उरलेले ५० टक्के रक्कम राज्य सरकार भरणार आहे. त्यामुळे अर्ध्या तिकिटीचे प्रवासी जेवढे वाढतील, तेवढेच १०० टक्के उत्पन्न एसटीचे वाढणार आहे.
---------------
मुंबई विभागाच्या उत्पन्नात चौपट वाढ
डेपो – आधीचे प्रवासी – एक दिवसांनंतर – आधीचे उत्पन्न – एक दिवसांनंतर
मुंबई – २३३ – १,१५३ – २३,७९८ – १,१९२०६
परळ – २२१ – ९४५ – ११,३२९ – ६२,८५७
कुर्ला – २५६ – १,३८८ – ४,३५४ – ५५,५७८
पनवेल – २,६३४ – ४,६९५ – ४८,४५९ – ८८,६३७
उरण – १,२०९ – ४,७०१ – १७,०४६ – ८१,३७४
मुंबई विभाग - ४,५५३ – १,२८८२ – १,०४,९८६ – ४,०७,६५२