चित्रपट निर्मात्याचे सोन्याचे दागिने चोरीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चित्रपट निर्मात्याचे सोन्याचे दागिने चोरीस
चित्रपट निर्मात्याचे सोन्याचे दागिने चोरीस

चित्रपट निर्मात्याचे सोन्याचे दागिने चोरीस

sakal_logo
By

अंधेरी, ता. २० (बातमीदार) : चित्रपट निर्मात्याच्या घरातील मोलकरणीने सुमारे पावणेदोन लाखांचे हिरेजडित दागिने घेऊन पलायन केल्याची घटना खार परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी मोलकरणीविरोधात खार पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवला आहे.

शबिना अब्दुल खान या चित्रपट निर्मात्या असून त्या खार येथील पाली हिलमध्ये राहतात. त्यांच्याकडे तीन तरुणी घरकामासाठी येत असून अफसाना शेख (वय २२) ही गेल्या चार महिन्यांपासून काम करते. ती दिवसभर काम करून त्यांच्यासोबत राहत होती; तर दोन महिला काम करून त्यांच्या घरी जातात. गुरुवारी (ता. १६) शबिना ही कुलाबा येथील एका लग्नावरून घरी आल्यानंतर तिने हिरेजडित सोन्याचे दागिने बेडरूमच्या टेबलावर ठेवून झोपण्यासाठी गेली होती. दुसऱ्या दिवशी शबिनाने दागिन्यांची पाहणी केली असता टेबलावर ठेवलेले सुमारे पावणेदोन लाखांचे दागिने गायब झाल्याचे दिसून आले. तसेच अफसाना ही घरातून कोणाला काहीही न सांगता निघून गेली होती. त्यामुळे अफसानाने चोरी केल्याची खात्री होताच तिने खार पोलिसांत तक्रार दाखल केली.