Tue, June 6, 2023

गोगटेवाडी परिसरात पिण्याच्या पाण्याची समस्या
गोगटेवाडी परिसरात पिण्याच्या पाण्याची समस्या
Published on : 20 March 2023, 12:28 pm
मालाड, ता. २० (बातमीदार) : गोरेगाव पूर्व येथील गोगटेवाडी परिसर हा अतिशय दाटीवाटीचा परिसर आहे. या ठिकाणी एकंदरीत अडीचशे घरे असून या विभागात १७ चाळी आहेत. येथील रहिवाशांना सध्या पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. नळाला कमी दाबाने पाणी येत आहे. पाणी व्यवस्थित येत नसल्यामुळे लोकांची परिस्थिती अतिशय बिकट बनली आहे.
गोगटेवाडीतील रहिवासी महापालिकेचा पाणी कर नियमित व्यवस्थित भरतात. मग महापालिका पाण्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करते आहे. परिसरात पाण्याचा अक्षरश: ठणठणाट आहे. तरी महापालिका प्रशासनाने या परिसरातील पाण्याची समस्या त्वरित सोडवावी, अशी विनंती स्थानिक नागरिकांनी केली आहे.