मालवणीतील चिकूवाडीत गरजूंसाठी कपडेवाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालवणीतील चिकूवाडीत गरजूंसाठी कपडेवाटप
मालवणीतील चिकूवाडीत गरजूंसाठी कपडेवाटप

मालवणीतील चिकूवाडीत गरजूंसाठी कपडेवाटप

sakal_logo
By

मालाड (बातमीदार) : मालवणीतील चिकूवाडी येथील कोंडाई देवी मंदिरात चियर्स फॉरेव्हर फाऊंडेशनच्या वतीने मालवणी परिसरातील गरजू नागरिकांना कपडेवाटप करण्यात आले. या वेळी लहान मुले, महिला तसेच पुरुषांचे कपडे जवळपास दीडशेहून अधिक रहिवाशांना दिल्याची माहिती चियर्स फॉरेव्हर फाऊंडेशनच्या संस्थापक स्नेहा मालिपेडी यांनी दिली. याप्रसंगी कार्यकर्ते, स्वयंसेवक, तसेच परिसरातील नागरिकांनी कपडेवाटपात मोलाचे सहकार्य केले.