जिजाऊ संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिजाऊ संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिर
जिजाऊ संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिर

जिजाऊ संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिर

sakal_logo
By

वाडा, ता. २० (बातमीदार) : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून रविवारी (ता. १९) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यता आले होते. राजर्षी शाहू मल्टी स्टेट को-ऑप. क्रेडिट सो.लि.चे अध्यक्ष संदीप शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थेच्या संपर्क कार्यालयात शेळके यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्‍घाटन करण्यात आले. या वेळी ७३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. ब्लड बँक जव्हार येथील टीमने रक्त संकलनाचे काम केले. या वेळी कामगार नेते महेंद्र ठाकरे, शशिकांत पाटील, डॉ. गिरीश चौधरी, प्रा. सचिन पाटील, संभाजी ब्रिगेडचे तेजस भोईर आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिजाऊ संस्थेचे सदस्य अरविंद देशमुख व अन्य कार्यकत्यांनी सहकार्य केले.