
वाड्यात महाआरोग्य तपासणी शिबिर उत्साहात
वाडा, ता. २० (बातमीदार) : भारतीय जनता पार्टी वाडा शहर शाखा, स्व. विष्णू सवरा स्मृती व एस. एम. बी. टी. हॉस्पिटल घोटी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. २०) ग्रामीण रुग्णालय, वाडा येथे महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या महाआरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन ठाणे ग्रामीण भाजपचे प्रभारी, ज्येष्ठ नेते बाबाजी काठोळे व पालघर जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात हृदयविकार, कर्करोग, शस्त्रक्रिया, नेत्ररोग, अस्थिरोग व स्त्रीरोग आदी आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. याप्रसंगी हरिश्चंद्र भोये, डॉ. हेमंत सवरा, जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष समीर पाटील, कृषी सभापती संदीप पावडे, जिल्हा उपाध्यक्ष संदीप पवार, तालुकाध्यक्ष मंगेश पाटील, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस कुणाल साळवी, तालुका सरचिटणीस रोहन पाटील, वाडा शहर अध्यक्ष हर्षल खांबेकर आदी मान्यवर उपस्थित होते.