
स्मशानभूमी नूतणीकरणासाठी २० लाखांचा निधी
बोर्डी, ता. २० (बातमीदार) : बोर्डी येथील स्मशानभूमीच्या नूतनीकरणासाठी आमदार निधीतून २० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार, अशी घोषणा डहाणू विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनोद निकले यांनी केली. रविवारी (ता. १९) आमदार विनोद निकोले, जिल्हा परिषद सदस्य ज्योती पाटील, बोर्डी ग्रामपंचायत प्रशासक प्रशांत जाधव, उद्योजक निखिल राऊत, स्मशानभूमी कमिटी अध्यक्ष किरण राऊत यांच्यासह गावातील मान्यवरांच्या उपस्थितीत नवीन स्मशानभूमी (विजयस्तंभजवळील, बोर्डी) चा भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. या वेळी विनोद निकोले यांनी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
जिल्हा परिषद सदस्य ज्योती पाटील यांनी या कामासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. गावातील तरुणांनी समितीची स्थापना करून बोर्डी येथील स्मशानभूमीचे नूतनीकरण करण्याचा निश्चय केला असून ग्रामस्थांचा या कामी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे, असे सांगून कार्यक्रमाच्या निमित्ताने आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा जयंत राऊत यांनी घेतला. याप्रसंगी अनेक ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे देणग्या दिल्या. समितीचे सचिव रमेश राऊत यांनी देणगीदारांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.