नववर्ष स्वागत यात्रेच्या मार्गात बदल

नववर्ष स्वागत यात्रेच्या मार्गात बदल

कल्याण, ता. २० (बातमीदार) : कल्याण रेल्वे स्थानक परिसर ते महात्मा फुले चौक परिसरात स्मार्ट सिटीअंतर्गत कामे सुरू आहेत. त्या परिसरात वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त असून त्याचा फटका नववर्ष स्वागत यात्रेला बसू नये यासाठी या वर्षी नववर्ष स्वागत यात्रेच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. कल्याण पश्चिममध्ये गुढीपाडव्याला निघणाऱ्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत सहभाग घेण्याचे आवाहन कल्याण संस्कृती मंच व रोटरी क्लब ऑफ न्यूच्या वतीने करण्यात आले आहे.
कल्याण पश्चिमेला ५ ते ६ ठिकाणच्या चौकात ढोल-ताशा पथके आपली कला सादर करणार आहेत. स्वागतयात्रेत आदिवासी लोकांचे तारपा नृत्य असेल. कर्णबधिर विद्यार्थ्यांचा वाद्यवृंद, लेझीम पथके असणार आहेत. भजनी मंडळे, अंगणवाडी यांचा सहभाग असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.

स्वागत यात्रेचा मार्ग
बुधवार, ता. २२ मार्च सकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी सुरुवात होणार आहे. ही यात्रा केडीएमसी आयुक्त बंगला मार्गे संतोषी माता मंदिर रोड, मॅक्सी ग्राऊंड, अनंत हलवाई, एचडीएफसी बॅंकमार्गे सहजानंद चौक, आग्रा रोड शिवाजी चौक, शंकरराव चौक, अहिल्याबाई चौक, टिळक चौक, पारनाकामार्गे लाल चौकीपर्यंत जाणार आहे. यात्रेचा समारोप नमस्कार मंडळ कल्याण पश्चिम येथे होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com