उड्डाणपूल मागणीसाठी बेमुदत उपोषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उड्डाणपूल मागणीसाठी बेमुदत उपोषण
उड्डाणपूल मागणीसाठी बेमुदत उपोषण

उड्डाणपूल मागणीसाठी बेमुदत उपोषण

sakal_logo
By

वासिंद, ता. २० (बातमीदार) : मुंबई-नाशिक महामार्गावरील वासिंद-खातिवलीजवळील क्रॉसिंगवर उड्डाणपूल व्हावा या मागणीसाठी येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सुरळके व ग्रामस्थांच्या वतीने मंगळवारपासून (ता. २१) बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे. वासिंद-खातिवलीजवळील क्रॉसिंगवर सद्यस्थितीत भुयारी मार्ग अथवा उड्डाणपूल नसल्याने वासिंद शहरात येताना किंवा शहापूर, नाशिककडे जाताना ही जागा अत्यंत धोकादायक ठरत आहे.
या जागी यापूर्वी अनेक अपघात घडून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे; तर कित्येक जण जखमी झालेले आहेत. या ठिकाणी आजूबाजूला मोठ्या संख्येने गृहसंकुल प्रकल्प झालेले आहेत. त्यातच वासिंद, शहापूर, खातिवली आदी ठिकाणी कामानिमित्त मोठ्या प्रमाणात या क्रॉसिंगवरून वाहनांची ये-जा सुरू असते. या महामार्गावरुन भरधाव वेगाने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांमुळे अपघात घडत आहेत. ही अपघातांची मालिका थांबून सुरक्षित प्रवासासाठी उड्डाणपूल व्हावा या मागणीसाठी मंगळवारपासून बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचे संजय सुरळके यांनी पत्रकाद्वारे म्हटले आहे.