मानखुर्दमध्ये नववर्ष स्वागतयात्रेचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मानखुर्दमध्ये नववर्ष स्वागतयात्रेचे आयोजन
मानखुर्दमध्ये नववर्ष स्वागतयात्रेचे आयोजन

मानखुर्दमध्ये नववर्ष स्वागतयात्रेचे आयोजन

sakal_logo
By

मानखुर्द, ता. २० (बातमीदार) : मानखुर्दमध्ये हिंदू नववर्षानिमित्त बुधवारी (ता. २२) हिंदू नववर्ष स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. मानखुर्दच्या हिंदू नववर्ष स्वागतयात्रा समितीने हे आयोजित केलेल्या यात्रेमध्ये सकल हिंदू समाजाने पुढाकार घेतला आहे. या यात्रेमध्ये परिसरातील सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, महिला बचत गट, वारकरी व भजन संप्रदाय, धारकरी तसेच अन्य संघटनांचे सदस्य सहभागी होणार आहेत. या वेळी पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात झांज, लेझीम पथक, भगव्या ध्वजासह पारंपरिक वेशभूषेत नागरिक सहभागी होतील. एक मानखुर्द एक उत्सव या संकल्पनेवर आधारित हे आयोजन दरवर्षी करण्यात येते. सगळे मानखुर्दकर या आयोजनात मागील नऊ वर्षे सहभागी होतात. सुमारे ५० हून अधिक कार्यकर्ते मागील महिनाभर या स्वागतयात्रेची तयारी करत आहेत.