Wed, June 7, 2023

कल्याणमध्ये भजन, रांगोळी स्पर्धा उत्साहात
कल्याणमध्ये भजन, रांगोळी स्पर्धा उत्साहात
Published on : 20 March 2023, 12:31 pm
कल्याण, ता. २० (बातमीदार) : नववर्ष स्वागतयात्रेपूर्वी कल्याण पश्चिममध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात नागरिक आणि संस्थांनी सहभाग घेत चांगला प्रतिसाद दिला. कल्याण पश्चिममध्ये कल्याण संस्कृती मंच व रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण आयोजित हिंदू नववर्ष स्वागत यात्रा गुढीपाडव्यादिवशी म्हणजेच बुधवारी (ता. २२) सिंडीकेट कल्याण येथून निघणार आहे. त्यापूर्वी भजन, पाककला, रांगोळी शिबिर, रांगोळी स्पर्धा आणि भगवा तलाव येथे भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. दीपोत्सवामधे जवळपास दोन हजार पणत्या नागरिकांनी प्रज्ज्वलित केल्या होत्या.