वाड्यात शोभायात्रेची जय्यत तयारी सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाड्यात शोभायात्रेची जय्यत तयारी सुरू
वाड्यात शोभायात्रेची जय्यत तयारी सुरू

वाड्यात शोभायात्रेची जय्यत तयारी सुरू

sakal_logo
By

वाडा, ता. २० (बातमीदार) : शहरातील सर्व संस्कृतीप्रेमी नागरिक व नववर्ष स्वागत समितीच्या वतीने आयोजित हिंदू नववर्ष (गुढीपाडवा) शोभायात्रा यंदा चैत्र शुद्ध प्रतिपदा बुधवारी २२ मार्च रोजी सकाळी ६.३० वाजता श्रीराम मंदिर येथून निघणार आहे. या शोभायात्रेच्या आयोजनाची जय्यत तयारी सुरू असून अनेक शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था, सार्वजनीक मंडळे यांचा सहभाग असणार आहे. या शोभायात्रा मार्गावर साईलीला सेवा मंडळ, व्यापारी मंडळ, ओम श्रीगणेश मित्र मंडळ व गुडलक यंग क्लब यांनी रांगोळी बरोबरच पाणी व सरबत व्यवस्था केली असून समर्थ कला क्रीडा, सामाजिक व शैक्षणिक मंडळ, गांवदेवी मित्र मंडळ, जय भवानी भाजी मार्केट, वाडा नागरी पतसंस्था, धर्मवीर मित्र मंडळ, संत रोहिदास मित्र मंडळ, अशोकवन रहिवाशी संघ व स्वामी समर्थ सेवा कला क्रीडा मंडळ आदी मंडळाचा सुद्धा सक्रिय सहभाग या शोभायात्रेत असणार आहे. पारंपरीक, मराठमोळ्या वेशभुषेत श्रीराम मंदिर येथून शोभायात्रा निघणार असून संपूर्ण वाडा शहरात फिरून पुन्हा श्रीराम मंदिर येथे या शोभायात्रेचा समारोप होणार आहे. या शोभायात्रेचे यंदा १४ वे वर्ष असून ही शोभायात्रा भव्य व यशस्वी करण्यासाठी नववर्ष स्वागत समितीचे निमंत्रक निलेश गंधे, संजय पातकर, पंढरी पाटील, तुषार यादव, मनिष देहरकर ,देवेंद्र भानुशाली, निलेश पाटील, राजेंद्र समेळ, राजेंद्र पाटील, श्रीकांत आंबवणे , रोहन पाटील, भाऊ भोपतराव,जगदीश गंधे ,युवराज ठाकरे, सुशील पातकर ,प्रमोद घोलप, नितीन म्हात्रे, मंदार रोडगे , संदीप पातकर, भरत गायकवाड, वैभव गंधे, सचिन पातकर, समीर म्हात्रे, सचिन वडजे, तेजस गंधे, कृणाल साळवी,पुष्कर पाटील, प्रसाद गंधे प्रसाद सोनटक्के, राजेश पवार, अंजिक्य पाटील, योगेश मलबारी,कैलास गवळी, कृणाल पाटील, मानस काबाडी आदी कार्यकर्ते विशेष मेहनत घेत आहेत.