अंबिका नगरमधील रस्ता वाहतुकीसाठी बंद

अंबिका नगरमधील रस्ता वाहतुकीसाठी बंद

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २० : डोंबिवली पूर्वेतील अंबिकानगरमधील रस्त्याचे सीमेंट काँक्रीटीकरणाचे काम पालिका प्रशासनाच्यावतीने हाती घेण्यात आले आहे. या रस्त्याच्या कामासाठी सोमवार (ता. २०) पासून येथील साईबाबा मंदिर ते मानपाडा रस्त्याकडे सरिता आईस फॅक्टरीमार्ग बंद ठेवण्यात आला आहे. या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत बंद ठेवण्यात आली असल्याची माहिती डोंबिवली वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक उमेश गित्ते यांनी दिली.
मानपाडा रस्त्याने सरिता आईस फॅक्टरीमार्गे पाथर्ली भागाकडे येणारी वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे. साईबाबा मंदिर ते मानपाडा रस्ता सरिता आईस फॅक्टरी रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. या रस्ते मार्गावरील वाहतूक अन्यमार्गे वळवण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी पालिकेच्या फ प्रभागाच्या विभागाच्या उपअभियंत्याकडून वाहतूक विभागाला केली होती. वाहतूक विभागाचे उपायुक्त यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. अंबिकानगरमधील साईबाबा मंदिर ते मानपाडा रस्ता काँक्रीटीकरणाचे काम सोमवारपासून हाती घेण्यात येत असल्याने वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक गित्ते यांनी या रस्त्यावरील वाहतूक पर्यायी रस्ते मार्गावर वळवण्याचे आदेश दिले आहेत. सोमवारपासून वाहन चालकांनी पाथर्ली येथील साईबाबा मंदिर चौक येथे डावीकडे वळण घेऊन एमआयडीसी रस्त्याने इच्छित स्थळी जावे, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे. रस्ता काँक्रीटीकरण काम पूर्ण होईपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद असणार आहे.

---------------------
बदलण्यात आलेली वाहतूक
पाथर्ली गोग्रासवाडी कडून आईस फॅक्टरीमार्गे मानपाडा रोडकडे येणारी वाहतूक साईबाबा मंदिर चौक येथे सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहतूक पाथर्ली गोग्रासवाडीकडून आईस फॅक्टरी मार्ग मानपाडा रोडकडे येणारी वाहतूक साईबाबा मंदिर चौक, पाथर्ली येथे डावीकडे वळण घेऊन एमआयडीसी रोडने आपल्या पुढीलमार्गे जातील; तर मानपाडा रोडने आईस फॅक्टरीमार्गे साईबाबा मंदिर, पाथर्लीकडे जाणारी वाहतूक सुरू ठेवण्यात आली असल्याचे वाहतूक विभागाने सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com