सुरक्षारक्षकांना सौजन्याचे डोस

सुरक्षारक्षकांना सौजन्याचे डोस

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २० : रुग्‍णालयाच्या मालमत्तेचे रक्षण करताना येथे येणाऱ्या नागरिकांशी सौजन्याने कसे बोलायचे याचे डोस सुरक्षारक्षकांना देण्यात आले. पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार कळवा येथील पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात हे प्रशिक्षण देण्यात आले. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी सौजन्याने वागताना रुग्णालयात कोणाचा गैरवावर सुरू असेल तर कशी समज द्यायची याचे धडेही यावेळी देण्यात आले.
महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दररोज तीन हजाराहून अधिक रुग्ण हे विविध तपासण्यांसाठी येत असतात. त्यांच्यासोबत असणारे नातेवाईक असे मिळून साधारणपणे चार ते पाच हजार नागरिकांची येथे नियमित वर्दळ असते. अशावेळी एखादा रुग्ण जर उपचारार्थ दाखल असेल तर त्याचे नातेवाईक हे रुग्णालयात वास्तव्यास असतात. आधीच आपल्या कुटुंबातील व्यक्ती दाखल असल्याने चिंतेत असलेल्या नातेवाईकांनी एखाद्या सुरक्षा रक्षकास काही माहिती विचारल्यास जर उडवाउडवीची उत्तरे मिळाली तर नागरिकांची चिडचिड होते. त्यातून अनेकदा भांडणे देखील होतात. परिणामी एका व्यक्तीच्या चुकीच्या वागणुकीमुळे चिडलेले नागरिक हे संपूर्ण प्रशासनाला दोष देतात.
असे प्रकार घडू नयेत यासाठी रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांना महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी फोर्सचे अधीक्षक रघुनाथ पालकर यांनी मार्गदर्शन केले. नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांमध्ये कोणतीही हयगय नको याकडे आयुक्त अभिजीत बांगर यांनी विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत. सरकारी कार्यालय असो की, रुग्णालय असो, कोणत्याही कार्यालयात येणाऱ्या नागरिकांशी सौजन्याने वागा असा सल्लाही सुरक्षारक्षकांना या मार्गदर्शन प्रशिक्षणात देण्यात आला.
------------------------------
२४७ सुरक्षारक्षक तैनात
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या इमारतीच्या चारही मजल्यावर सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहे. यात पुरुष जवानांची संख्या ७० तर महिला सुरक्षारक्षकांची संख्या ११ इतकी आहे. ज्या ठिकाणी महिला रुग्ण दाखल असतात, त्या ठिकाणी महिला सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच प्रसुती कक्षाची सुरक्षाही देखील महिला सुरक्षारक्षकांच्या हाती आहे. त्यामुळे या ठिकाणी अत्यंत जबाबदारीने व काटेकोरपणे २४७ सुरक्षारक्षक तैनात असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com