मांगगारुडी समाजाचा विधिमंडळावर महामोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मांगगारुडी समाजाचा विधिमंडळावर महामोर्चा
मांगगारुडी समाजाचा विधिमंडळावर महामोर्चा

मांगगारुडी समाजाचा विधिमंडळावर महामोर्चा

sakal_logo
By

मुंबादेवी, ता. २० (बातमीदार) : अनुसूचित जातीच्या १५९ प्रवर्गात मांगगारुडी समाज येत असल्याने आमच्या वाट्याला काहीच येत नाही. त्यामुळे सरकारमध्ये राजकीय प्रतिनिधित्व मिळत नाही, म्हणून आमची मांगगारुडी अशी वेगळी नोंदणी व्हावी, अशी प्रमुख मागणी करत बुधवारी (ता. २२) मांगगारुडी समाजाचा मोर्चा महाराष्ट्र विधिमंडळावर धडक देणार असल्याची माहिती अमर कसबे यांनी आज (ता. २०) रोजी मुंबई मराठी पत्रकार संघात दिली. या वेळी मुरलीधर गायकवाड, दीपक लोंढे, सचिन लोंढे, वाल्मीक फाजगे, दीपक कसबे, पोपट सकस, गजानन उमप, विमल ढालवाले आणि शीतल राखपसरे उपस्थित होते. मांगगारुडी समाजाला शासकीय नोकरीत संधी उपलब्ध व्हावी, व्यवसाय शिक्षणासाठी कर्ज उपलब्ध व्हावे, समाज मंदिर आणि आश्रमशाळा असाव्यात, अशी मागणी अमर कसबे यांनी केली.