Sun, June 4, 2023

पूर्ववैमनस्येतून एकावर जीवघेणा हल्ला
पूर्ववैमनस्येतून एकावर जीवघेणा हल्ला
Published on : 20 March 2023, 3:05 am
ठाणे, ता. २० (वार्ताहर) : पूर्ववैमनस्येतून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एकावर हल्ला केल्याची घटना राबोडी परिसरात घडली आहे. फिर्यादी आशिष अशोक राजभर, आझाद नगर, ठाणे हा आपला मित्र दिनेश चव्हाण याच्या घरी गप्पा मारत बसला असता जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी अतुलने धारदार शस्त्राने आशिष याच्यावर जीवघेणा हल्ला करीत ठार मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, फिर्यादी आणि आरोपी हे ऐकामेकांच्या परिचयाचे आहेत. या घटनेनंतर राबोडी पोलिस ठाण्यात आरोपी अतुल याच्याविरोधात शनिवारी (१८ मार्च) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.