मुंबई विमानतळावर ७० कोटींचे ९.९७ किलो हेरॉईन जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई विमानतळावर ७० कोटींचे ९.९७ किलो हेरॉईन जप्त
मुंबई विमानतळावर ७० कोटींचे ९.९७ किलो हेरॉईन जप्त

मुंबई विमानतळावर ७० कोटींचे ९.९७ किलो हेरॉईन जप्त

sakal_logo
By

मुंबई, ता. २०: महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई विभागीय पथकाने ७० कोटींचे ९.९७ किलो हेरॉईन जप्त करत दोघांना रविवारी (ता. १९) विमानतळावर अटक केली आहे. आफ्रिकेतील आदिस अबाबाहून मुंबईला येणाऱ्या एका प्रवाशाद्वारे अमली पदार्थांची भारतात तस्करी करण्यात येणार असल्याची गुप्त माहिती डीआरआय अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीनुसार मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीआरआयच्या पथकाने पाळत ठेवली होती. या प्रकरणात संशयित प्रवाशाला पथकाने अडवले आणि त्याच्याकडील सामानाची कसून झडती घेतली असता त्यात ९.९७ किलो आढळून आले. हे हेरॉईन मुंबईतील एका हॉटेलमध्ये एका व्यक्तीला देणार असल्याची माहिती दिली.